शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

५८ शहरांत वायफाय स्पॉट

By admin | Published: January 11, 2016 3:28 AM

डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत.

मुंबई : डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी १७४ वायफाय स्पॉट हे महाराष्ट्रातील ५८ शहरांतून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली. आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. एनजीएन अर्थात नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख नवीन इंटरनेट कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोबाइलवरून इंटरनेटचा वापर सुलभ करणारे मोबाइल नेटवर्क इंटेलिजन्स केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या वतीने टाटा डोकोमोच्या माध्यमातून शेअर बाजाराच्या परिसरात वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवेचे अनावरण मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारचे डिजिटल इंडिया मिशन आणि त्या अनुषंगाने आगामी काळातील अपेक्षित घडामोडींची माहिती दिली. (प्रतिनिधी)इंटरनेटवर ५० कोटी नवे ग्राहक जोडणार मुंबई : केंद्राने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे ५० कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली. - सविस्तर वृत्त/९ट्रायच्या अहवालानंतरच नेट न्यूट्रॅलिटीवर निर्णयगेल्या वर्षात नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर यू टर्न घेतल्यानंतर, यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाला सर्वंकष अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात सरकार आपला ठोस निर्णय जाहीर करेल, असे रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यासाठी एमटीएनएलच्या माध्यमातून सध्या मुंबईत आॅप्टिकल फायबर नेटवर्कच्या जोडणीचे काम सुरू आहे. या माध्यमातून आगामी काही महिन्यांत सुमारे एक लाख ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. भारतीय टपाल खात्याने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. स्पीड पोस्ट कुरियर सेवेच्या माध्यमातून पोस्टाला मोठी भूमिका बजावता येणे शक्य आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात तोटा नोंदविणाऱ्या या सेवेला ई-कॉमर्समुळे मोठा लाभ झाला आहे.