शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

बाल स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूपाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 5:20 AM

स्वच्छतेचा जागर घालण्यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बालस्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

मुंबई : स्वच्छतेचा जागर घालण्यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बालस्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ‘स्वच्छ भारत २०१९’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाल स्वच्छता मोहीम अधिक व्यापक करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.स्वच्छतेचे बीज लहान मुलांमध्ये शिक्षण घेत असतानाच रुजविले पाहिजे. त्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य या बाबतचे धडे त्यांनी गिरविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना पालक करतात, त्याचप्रमाणे आपला परिसर, आपली शाळा, आपले गाव, आपले शहर, राज्य, आपला देश स्वच्छ ठेवण्याचेही शिक्षण बालवयात देणे गरजेचे आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, हात स्वच्छ धुऊन जेवण केल्यानंतर मुलांच्या आरोग्यात ६० टक्के सुधारणा होते. त्यामुळे ही गोष्ट तळागाळातील मुलांमध्ये रुजविण्यासाठी गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. यात कल्पकतेने तयार करण्यात आलेल्या बॅनर, होर्डिंग्ज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक फलक यांचा वापर करणे हिताचे ठरेल.बाल स्वच्छता मोहिमेत स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणारे संदेश स्पर्धांचादेखील समावेश करण्यात यावा. याचबरोबर स्वच्छता या विषयाखाली चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी या स्पर्धांचा समावेश करावा. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक उपक्रमातून लहानग्यांमध्ये स्वच्छतेचे बीज रुजविणे शक्य आहे.जेवणापूर्वी व नंतर, तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री पालकांनी करावयाची आहे. त्याचबरोबर, हीच सवय योग्य असल्याचे मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.स्वच्छ भारत संकल्प साकार करण्यासाठी बाल स्वच्छतेसह स्वच्छ किल्ले, स्वच्छ शहर, स्वच्छ परिसर या उपक्रमांसह शासनाच्या विविध विभागांतर्फेदेखील स्वच्छता मोहिमेचे आयोजनही त्या-त्या स्तरावर करणे गरजेचे आहे.दोन वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूच्या जयंतीपासून अर्थात, बालदिनापासून बाल स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट ठेवले आहे.हे ध्येय गाठण्यासाठीदेशातील प्रत्येक घटकांचीजबाबदारी आहे. देशात युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने युवा वर्गाने बाल स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.स्वच्छतेचा संबंध थेट आपल्या आरोग्यासाठी आहे, त्यामुळे सानिक व व्यक्तिगत निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संस्कार बालमनावर करणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. राज्यातील जीवनवहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना मिळतील. यामुळे प्रवास करताना योग्य काळजी घेतल्यास सुट्ट्याचा पुरेपूर आनंद घेता येईल. प्रवास करताना विविध गोष्टींना स्पर्श होतो. यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ खाताना हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान शक्यतो बाहेरचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर, प्रवासा दरम्यान धूळ, हवा यांच्या संपर्कात आल्यामुळे खोकला होण्याची शक्यता आहे. लहान-लहान गोष्टींमध्ये स्वच्छतेची काळजी पालकांनी शेवटी लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. यामुळे स्वच्छतेची सवय सर्व स्तरावरील घटकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.-अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळप्रवासादरम्यान बदलत्या हवामानामुळे प्रकृती खालावण्याची शक्यता असते. प्रवासात लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रेनमधील शौचालय अथवा वॉश बेसिन वापरल्यानंतर हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. शिवाय रेल्वे स्थानकावर आणि ट्रेनमधील अधिकृत विक्रेते वगळता अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेणे टाळावे. ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ खाताना लहान मुलांना योग्य सूचना देणे पालकांचे कर्तव्य आहे.- सुनील उदासी,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Healthआरोग्य