शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पत्नीने उधळले पतीचे दुसरे लग्न!

By admin | Published: December 21, 2015 2:06 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करणाऱ्या पतीचे दुसरे लग्न नागपूर येथील एका महिलेने पोलिसांच्या मदतीने रविवारी उधळवून लावले

अकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करणाऱ्या पतीचे दुसरे लग्न नागपूर येथील एका महिलेने पोलिसांच्या मदतीने रविवारी उधळवून लावले. पोलिसांना पाहताच, नियोजित वधू व वराच्या नातेवाईकांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला.नागपूरमधील एका उच्चशिक्षित युवतीचे मूर्तिजापूर येथील या वकील युवकासोबत पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु नंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे पीडित महिलेने पतीविरुद्ध नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.लग्नसमारंभासाठी नियोजित वधू व वराकडील मंडळी जमली; परंतु पत्नीला याची माहिती मिळाल्याने, ती तिच्या नातेवाईकांना घेऊन अकोल्यात दाखल झाली आणि तिने खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तिला पोलिसांसह येताना पाहताच वधू व विधिज्ञाकडील नातेवाईकांनी तेथून पळ काढला.