शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जोडीदाराच्या शोधात वाघिणीचे ‘सीमोल्लंघन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:02 AM

पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रापासून तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे असलेले अंतर एका वाघिणीने जोडीदाराच्या शोधात पार केले.

नम्रता फडणीस ।पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रापासून तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे असलेले अंतर एका वाघिणीने जोडीदाराच्या शोधात पार केले. सध्या ती भंडारा जिल्ह्यातील उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्यात असून नव्या क्षेत्राची चाचपणी करीत आहे.एखाद्या भागातील अभयारण्यामधले क्षेत्र धोकादायक वाटले किंवा भक्ष्याच्या अथवा जोडीदाराच्या शोधात साधारणपणे वाघ हे दुस-या जागी स्थलांतरित झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यासाठी वाघांनी अगदी ४०० किलोमीटरचे अंतर पार केल्याची उदाहरणे आहेत. मात्र वाघिणींचे प्रमाण त्यातुलनेत अगदीच नगण्य आहे. या वाघिणीने रेल्वेमार्ग, वैनगंगा नदी, वीज प्रकल्प, मानवी वस्ती असे अडथळे पार करून उमरेड करांडला पवनी अभयारण्यात २३ डिसेंबरला प्रवेश केला आहे. तो क्षण पुण्यातील प्रणव जोशी व सुमीत खरे या पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकारांनी कॅमे-यात टिपला आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शिवांझरी या वाघिणीच्या चार बछड्यांपैकी एका नर आणि मादी बछड्याला वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (डब्लूआयआय) ने अभ्यासादरम्यान मार्च २०१७मध्ये कॉलर आयडी बसविले होते. त्यातीलच ही एक वाघीण आहे. ही वाघीण स्वत:चा अधिवास निर्माण करायला आली आहे. याला उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा विष्णू राऊत यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, ही कोळसा परिक्षेत्रातील ताडोबा अंधेरी प्रकल्पातून जोडीदाराच्या शोधात आलेली वाघिण आहे.>‘उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्यात सध्या वाघांची संख्या १४ आहे. त्यामुळे ती इथे राहाण्याची शक्यता काहीशी कमी आहे. ती मार्गक्रमण करीत भोर व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रात जाण्याची शक्यता अधिक आहे.- दादा विष्णू राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्य.

टॅग्स :Tigerवाघ