शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

मुंबईकरांसाठी वायफाय सेवा बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 9:37 PM

रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध केल्यानंतर आता बेस्ट उपक्रमही ही भेट देणार आहे. ५२ बसमार्गांवर प्रवाशांना लवकरच वायफाय सेवेचा

 ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध केल्यानंतर आता बेस्ट उपक्रमही ही भेट देणार आहे. ५२ बसमार्गांवर प्रवाशांना लवकरच वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. काही प्रमुख बस स्थानकांमध्येही वायफायची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऐवढचे नव्हे तर यासाठी बसविण्यात आलेल्या रॉयटर्समुळे बस किती वेळेत त्या बस स्थानकावर पोहोचेल, याची माहिती मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असतात. आजच्या हायटेक युगात जगाच्या पुढे राहण्यासाठी वायफाय सेवा काळाची गरज बनली आहे. यामुळे रेल्वेपाठोपाठ बेस्ट उपक्रमानेही बसगाड्यांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महत्वाचे बस स्थानक आणि बसगाड्यांमध्ये राऊटर्स बसविण्यात येणार आहेत. दर महिन्याला पाचशे बसगाड्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बसची अचूक वेळ कळणार...बस स्टॉपवर बसगाडी येण्याची वाट बघत प्रवाशांना बराच काळ तिष्ठत राहावे लागत असते. मात्र राऊटर्समधील ग्लोबल पॉझिशनिंग सिस्टममुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरील अ‍ॅपवर इच्छित बस किती वेळेत बसस्टॉपवर पोहोचेल, याची अचूक वेळ मिळू शकणार आहे.बेस्ट उत्पन्न...आर्थिक संकटात असलेले बेस्ट उपक्रम कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे खर्च करण्याच्या मनस्थितीत नाही़. त्यामुळे उत्पन्न आणि सेवा असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंदाजे दोन कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न जाहिरातीच्या माध्यमातून बेस्टला मिळण्याची शक्यता आहे़ तसेच या सेवेचा लाभ ३० लाख प्रवाशांना घेता येणार आहे. - ४०१५ राऊटर्स बसगाड्या व बस स्थानकांमध्ये बसविण्यात येणार आहेत.- यामुळे ५२ बस मार्ग आणि ३९६३ बसगाड्यांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे. - याचा लाभ ३० लाख प्रवाशांना मिळू शकेल.- बेस्ट उपक्रमाला जाहिरातीच्या माध्यमातून अडीच ते तीन कोटी उत्पन्न मिळू शकेल.