शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

एसी डबल डेकरची वेळ बदलणार?

By admin | Published: August 16, 2016 2:06 AM

कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी डबल डेकर ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज बांधत मुंबईतून

मुंबई : कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी डबल डेकर ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज बांधत मुंबईतून डबल डेकर ट्रेन सुटण्याची सकाळची वेळ बदलण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेची बोलणी सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. २0१४मध्ये गणेशोत्सवकाळात एलटीटी ते मडगाव अशी एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र प्रिमियम म्हणून सुरू केलेल्या या ट्रेनला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. अवाच्यासवा भाडे वाढवण्यात येत असल्याने प्रवाशांनी या ट्रेनकडे पाठच फिरवली. त्यानंतर गर्दी नसलेल्या काळात म्हणजेच दिवाळीत कोकणसाठी ही गाडी पुन्हा चालविण्यात आली. परंतु गर्दीचा काळ नसल्याने ही ट्रेन रिकामीच धावू लागली. त्यानंतर देखभाल-दुरुस्तीचे कारण देत डबल डेकर सायडिंगलाच ठेवण्यात आली. याचा गाजावाजा झाल्यानंतर पुन्हा एकदा एसी डबल डेकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नवीन एसी डबल डेकर ९ डिसेंबर २0१५पासून एलटीटी ते मडगाव सुरू करण्यात आली. ही ट्रेन पुन्हा सुरू होताच तिला सुरुवातीलाच ५२ टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर हा प्रतिसाद कमी होत गेला. ही ट्रेन सुरू होताच त्याला सुरुवातीपासूनच मिळणारा कमी प्रतिसाद यामुळे त्याची माहिती रेल्वेकडून घेण्यात आली असता ट्रेनची पहाटेची असलेली वेळ आणि त्याला लागणारा जादा वेळ हे कारण असल्याचे समोर आले. एसी डबल डेकर ट्रेन एलटीटीहून (लोकमान्य टिळक टर्मिनस) पहाटे साडे पाच वाजता सोडली जाते आणि मडगाव येथे त्याच दिवशी १७.५0 वाजता पोहोचते. प्रवाशांना एलटीटीहून पहाटेची ट्रेन पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता म्हणाले की, डबल डेकर ट्रेनला कमी प्रतिसाद मिळतो. कोकणातून सुटताना ६0 टक्के तर मुंबईतून सुटताना ट्रेन फक्त ४0 टक्केच प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले. या ट्रेनची असलेली पहाटेची वेळ सोयीस्कर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे डबल डेकर ट्रेनची वेळ संध्याकाळची ठेवता येते का याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेशीही चर्चा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.डबल डेकरपेक्षा जनशताब्दीला अधिक पसंती१एलटीटीहून एसी डबल डेकर पहाटे साडे पाच वाजता सोडण्यात येते आणि मडगाव येथे संध्याकाळी ५.५0 वाजता पोहोचते. २तर दादर ते मडगाव जनशताब्दी ही पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि मडगाव येथे येथे संध्याकाळी ४ वाजता पोहोचते.३जनशताब्दी दादर येथून सुटतानाच ती मडगाव येथे डबल डेकरच्याही आधी पोहोचत असल्याने प्रवाशांनाही ही ट्रेन सोयीची पडते. त्यामुळे या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो.