मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी २९ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.
रविवारीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार
By admin | Published: January 28, 2017 1:11 AM