शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
2
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
3
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
4
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
5
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
6
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
7
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
8
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
10
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
11
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
12
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
13
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
14
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
15
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
16
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
17
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
18
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
19
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
20
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...

उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 1:47 PM

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर, संपूर्ण राज्यातील राजकाण जबरदस्त तापले आहे. याप्रकरणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. मात्र, तरीही या मुद्यावरून सरकारचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारला 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस? -फडणवीस म्हणाले, "माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडेजर लावून तोडला, त्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाटवला, त्या बद्दल एक शब्दही का बोलत नाहीत, सर्वप्रथम याचे उत्तर द्यायला हवे." 

"एवढी वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजीना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण, जणू काही महाराज सामान्य माणसाची लुट करायला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाल एवढी वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात?  हे सागितलं पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे