विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांच्या नेत्यांनी अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मागण्यांबाबत भेट घेतली होती. तेव्हा सातवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र पाच दिवसांच्या आठवड्याबाबत त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीपासून करणार याची तारीखही शासनाने जाहीर केलेली नाही.राजपत्रित अधिकारी महासंघाने आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचे इतिवृत्त प्रसिद्धीसाठी पाठविले. त्यात सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल त्यावेळी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत विचार केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हटले आहे. ही अंमलबजावणी कधी होणार हेही अद्याप जाहीर झालेले नसल्याने पाच दिवसांच्या आठवड्याबाबत शासन नेमका कधी विचार करणार हेही नक्की नसल्याचे स्पष्ट झाले.
पाच दिवसांचा आठवडा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 4:04 AM