ठाणे : कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या महिलेने बलात्काराचा बनाव केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.रविवारी सायंकाळी झालेली ही कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले. या महिलेचे पती व्यंकटेश यांनी दीड वर्षापूर्वी कर्नाटकातील शिरसप्पाच्या पत्नीवर अॅसिड फेकल्याचा आरोप आहे.याच प्रकरणात त्याला अटकही झाल्यामुुळे तो कारागृहात होता. शिरसप्पा व त्याचे साथीदार आपल्याला नव्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती व्यंकटेशने पत्नीकडे बोलून दाखवली होती. आपले वडील व आई यांचे संभाषण त्यांच्या मुलीने ऐकले होते. त्यामुळे तिने बलात्काराचा बनाव करण्याची युक्ती आईला सुचवली होती.वैद्यकीय तपासणीत बलात्काराचे पुरावे नाहीतबलात्काराचा आरोप करणाºया महिलेच्या वैद्यकीय तपासणीत या आरोपास दुजोरा मिळालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांना वैद्यकीय अहवालाची जोड लाभली आहे.तिघांचे जबाब नोंदविणार...कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांचे एक पथक तेलंगणातील तीन कथित आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी गेले आहे. त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर इतर सर्व बाजूंची पडताळणी करून बलात्काराचा गुन्हाच रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.
बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:20 AM