शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?; देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 5:36 PM

सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही असं फडणवीस म्हणाले.

मुंबई -  नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत योग्यवेळी योग्य भूमिका घेऊ असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे. नाशिकमध्ये भाजपाने अधिकृत कुणालाही उमेदवारी दिली नाही. त्यातच काँग्रेसनं सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरला नाही. सुधीर तांबे यांनी माघार घेत चिरंजीव सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

नाशिकमध्ये भाजपा सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असलं मानलं जात असले तरी राजकारणात जोवर अंतिम निर्णय होत नाही तोवर काहीही स्पष्टता नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नाशिक निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. सत्यजित तांबे युवा नेतृत्व आहे. त्यांचे काम चांगले आहे. सर्व राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे योग्यवेळी करावे लागतात. त्यानुसार यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. 

त्याचसोबत सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील. वाट पाहा. आम्ही तिथे कोण उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न करत होतो. विखेंनी तिथे उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा होती. परंतु काही कारणात्सव त्यांनी असमर्थता दाखवली अशीही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 

बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही - काँग्रेस सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस