लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : फॉक्सकाॅन कंपनी गुजरातला गेल्यामुळे माझ्यावर टीका केली जात असली, तरी ही कंपनी गेल्या सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत केला. तसेच मविआच्या काळात त्यांना कंटाळून किती कंपन्या महाराष्ट्र सोडून गेल्या त्याचीच यादी येणाऱ्या काळात जाहीर करणार असल्याचा इशारा या सभेत एकनाथ शिंदे यांनी या सभेत दिली.
मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण यावेळी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या सह जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
होय मी मोदींचा हस्तक...माझ्यावर मी मोदी-शहांचा हस्तक असल्याची टीका केली जात असते, मात्र मविआच्या काळात दाऊदच्या हस्तकाची पाठराखण केल्याचे सांगत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दाऊदच्या हस्तकांची पाठराखण करणाऱ्यांपेक्षा मी मोदींचा हस्तक होणे पसंत करेल अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले.
आता राज्यात विकासाचे व्हिजन ठेवणारकेंद्र शासनाच्या मदतीने राज्याला मोठे उद्योग देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले असून, आगामी अडीच वर्षांच्या काळात आता महाराष्ट्रात विकासाचे व्हिजन ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. एकही बंडखोर आमदार निवडून येणार नाही अशा वल्गना करणार्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालाने उत्तर मिळाल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली.आम्हाला आमच्या सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणण्याची गरज पडत नाही. जनतेने आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जाहीर केले असून, त्याचा प्रत्यय होत असलेल्या सभांमधून दिसत आहे. नाहीतर अनेकांना त्यांच्या सभांमध्ये माणसं मिळत नसल्याने एकतर भाड्याने किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेण्याची वेळ येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.