शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:12 AM

विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं. विधानभवनाच्या गेटपासून पायऱ्यांपर्यंत हे दोन्ही नेते एकत्रित संवाद करत येताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यामुळे भविष्यात ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र दिसू शकतात अशी राजकीय चर्चा सुरू झाली. त्यात मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारल्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना भेटतात. रस्ता एकच असतो. विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो. अद्यापतरी देशात सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे रस्ते तयार झाले नाहीत. ज्यांना हवे असेल ते करू शकतात. त्यामुळे फडणवीस-ठाकरे भेट हा विषय नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच विधानभवनात जाताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित पुढे आले, संवाद करत विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत गेले याचा अर्थ ते एकत्र येतील असं नाही. फडणवीस आणि ठाकरेंच्या वाटा अजिबात एकत्र येणार नाहीत, हे मी सांगतोय असं सांगत ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

फडणवीस-ठाकरे भेटीचीच चर्चा, काय घडलं?अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. ठाकरे गटाचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव ठाकरे. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि त्यांनी बोलत बोलत विधानभवनात एन्ट्री केली. 

आठ महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या भेटीत सहजता होती.  कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असं म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत