शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार; अजित पवारांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:25 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात (जुलै २०२३) एकूण ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडल्या.

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यावेळी विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. 

पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात (जुलै २०२३) एकूण ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडल्या. यापैकी १३ हजार ९१ कोटी २१ लाख रुपयाच्या मागण्या या अनिवार्य, २५ हजार ६११ कोटी ३८ लाख रुपयांच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत आणि २ हजार ५४० कोटी ६२ लाख रुपयांच्या मागण्या या केंद्रपुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या मांडल्या. तसेच, ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या स्थूल पूरवणी मागण्या दिसत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ३५ हजार ८८३ कोटी ३१ लाख एवढाच असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुरवणी मागणीतील महत्वाच्या तरतुदी...

१) जलजीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींकरिता राज्य हिस्सा म्हणून ५ हजार ८५६ कोटी रुपये, 

२) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थींना राज्याच्या ‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी ४ हजार कोटी रुपये,     ३) अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा अनुज्ञेय हप्ता देण्यासाठी ३ हजार ५६३ कोटी १६ लाख रुपये,

४) मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी २ हजार १०० कोटी रुपये,

५) लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपये, 

६) केंद्रसरकारच्या जलजीवन मिशनच्या अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांकरिता राज्य हिस्सा १ हजार ४१५ कोटी रुपये, 

७) पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान देण्यासाठी १ हजार ३९८ कोटी ५० लाख रुपये, 

८) केंद्रसरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी १ हजार २०० कोटी रुपये, 

९) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता १ हजार १०० कोटी रुपये, 

१०) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता १ हजार कोटी रुपये, 

११) महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ठ्यपूर्ण कामांसाठी १ हजार कोटी रुपये, 

१२) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा ९६९ कोटी रुपये, 

१३) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा ९३९ कोटी रुपये, 

१४) केंद्रपुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) ८०० कोटी रुपये, 

१५) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपदान, अंशराशीकरण आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी ७८९ कोटी ४१ लाख रुपये, 

१६) केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी ७९८ कोटी १ लाख रुपये, 

१७) संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता ६०० कोटी रुपये, 

१८) लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान ५५० कोटी रुपये, 

१९) पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करुन देण्यासाठी ५४९ कोटी ५४ लाख रुपये, 

२०) केंद्रिय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरुन काढण्यासाठी ५२३ कोटी २३ लाख रुपये यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा