शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करणार

By admin | Published: March 28, 2016 1:51 AM

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण

नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण जवळजवळ तयार झाले आहे. त्यात दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील तिसऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलनात दिव्यांग उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण झाले. एक हजार अपंगांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. गेल्या सव्वा वर्षात राज्य शासनाने दिव्यांगांसाठी २७ शासन निर्णय निर्गमित केले आहेत. अपंग धोरणाला अंतिम स्वरूप देण्याअगोदर विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्र्यांना त्यादृष्टीने सूचना करण्यात आली होती व ते काम वेगात सुरू आहे. धोरण लवकरच तयार होईल व त्याला मान्यतादेखील मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग सहजपणे येऊ शकले पाहिजे, अशी सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेअंतर्गतदेखील विविध प्रकल्प राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.विविध संस्थांमध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावर सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद आसुदानी यांनी दिव्यांगांच्या मनातील वेदना बोलून दाखविल्या. दिव्यांग व्यक्तींना आजदेखील समाजात हवा तो सन्मान मिळत नाही. त्यांना कुणाची दया नको, तर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हवी असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१६ व्यक्तींचा गौरव : जयसिंग चव्हाण, डॉ. रविंद्र नांदेडकर, नसिमा हुरजूक, भावेश भाटिया, बंदे नवाज नदाफ, अमोल वाळके, राजेश खडके, दीपक सोनी, सुनील ठाकरे, बिरजू चौधरी, किशोर नेवे, भास्कर हिवराळे, अशोक भोईर, माधुरी भालेराव, मेघा काळे, अशोक मुन्ने या १६ उद्योगपतींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.