राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबतच राहणार का किंवा ते वेगळा गट स्थापन करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“संध्याकाळी आमदारांची एक बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. तो तुम्हाला संध्याकाळी कळेल,” असं उत्तर एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पुढील भूमिकेवर बोलताना दिलं. एबीपी माझाशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याशिवाय आपलं संख्याबळ आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि विश्वास ठेवणारे आहोत. तिच भूमिका महाराष्ट्राच्या जनतेचीही आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना नेता मानता का?पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे जाणार असल्याची भूमिका मांडली. याच वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला, अशी चर्चा रंगल्याचे दिसत आहे.