शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नितेश राणेंविरोधात नोटीस बजावणार, राणे कुटुंबीय माझ्या वाईटावर उठले आहेत - वरुण सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 3:47 AM

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे.

मुंबई : राणे कुटुंबीयांना बेछूट आरोप करायची सवय लागली आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. मात्र, अशा आरोपांमुळे माझ्या राजकीय आयुष्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची मानहानीची तक्रार दाखल करणार असल्याचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. (Will issue notice against Nitesh Rane said Varun Sardesai)

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. तर, राणे यांच्या कुटुंबाचा इतिहास सर्वश्रुत आहे. राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करण्याची त्यांची सवय आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि मनाला वेदना देणारे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत अन्यथा फौजदारी स्वरुपाच्या मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे, असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

सरदेसाई यांना वाय दर्जाची सुरक्षा मिळाल्याचा आरोप नाकारतानाच मला केवळ एक्स दर्जाची सुरक्षा आहे. राणे कुटुंब माझ्या वाईटावर उठल्यानेच महाविकास आघाडी सरकारने मला ही सुरक्षा दिली असावी. मागच्या सहा महिन्यातील त्यांच्या पत्रकार परिषदेतील भाषा पाहिली तर त्याचा अर्थ तोच निघतो, असे सरदेसाई म्हणाले.

आधी शिक्षा, मग चाैकशी करायची हे आमचे धाेरण नाही - अनिल परबखोटेनाटे आरोप करून राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सुशांतसिंह प्रकरणासह अशा सर्व बाबींचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. तपास पूर्ण होऊ द्या, दोषींना माफी नाही. आधी शिक्षा मग चौकशी, हे आमचे धोरण नाही, असे परिवहनमंत्री अनिल परब यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे