शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर राणे म्हणतात, आधी नवा संसार तर थाटू द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 3:33 PM

भाजप प्रवेशाबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नाला राणेंचं उत्तर

सावंतवाडी: आधी मला गृहप्रवेश करुन नवा संसार थाटू दे. त्यानंतर काय ते प्रश्न विचारा, असा टोला खासदार नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना लगावला. येत्या आठ दिवसात मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी आवश्यक असलेलं भविष्य मी काढलंय, असंदेखील राणे म्हणाले. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संपूर्ण जिल्हा भाजपमय होईल. यानंतर जिल्ह्यातले पुढचे आमदार, खासदार भाजपचेच असतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढच्या आठ दिवसात माझा भाजप प्रवेश होईल. त्याबद्दल वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देणार नाही, असा टोला राणेंनी लगावला. सध्या मी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यांना माझ्यासोबत येण्याचं आवाहन करत आहे. माझ्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते भाजप प्रवेशानंतर ठामपणे माझ्या पाठिशी उभी राहतील, असं राणे म्हणाले. नाणारबद्दल तुमची भूमिका काय, या प्रश्नावर नारायण राणेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. आधी भाजपत प्रवेश करतो. त्यानंतर भूमिका जाहीर करेन, असं राणे म्हणाले. नाणारमध्ये दोन-तीन दिवसात प्रकल्प येणार नाही. त्यामुळे घाई नको. वेळ आल्यावर नाणारबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देईन, असं म्हणत राणेंनी सावध भूमिका घेतली. यावेळी ईव्हीएमबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.   

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा