महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने साहित्य संमेलनाचा निधी वाढविण्यासाठी पुढीलअर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.इमारत बंद, शाळा नव्हे!राज्यातील १,३०० मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्या संदर्भात तावडे म्हणाले, ‘‘पटसंख्या कमी असलेल्या अनेक शाळा राज्यात आहेत.अशा शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेमध्ये शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे, शाळा बंद केलेल्या नाहीत, तर इमारती बंद झाल्या आहेत.’’मराठीचा वापर वाढविणारमराठी भाषेच्या वापरासाठी सक्ती करता येणार नाही. त्यामुळे आग्रह करून मराठीचा वापर वाढविण्यावर राज्य सरकारचा भर राहील. इतर विषयांमधून मराठी वेगळी काढून विद्यापीठ स्थापन करणे अवघड आहे. विद्यापीठामध्ये मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यावर सरकारचा भर असेल, असे तावडे म्हणाले.
मराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 6:10 AM