Jayant Patil vs BJP: ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू केले होते. ब्रिटिशांचे राज्य हे जनतेच्या हिताचे नसल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. सध्या देशातील आणि राज्यातील सरकार देखील ब्रिटिशांसारखे काम करत आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी एकत्रित येत आहे. या सरकार विरोधात लोकशाहीसाठी लढण्यात आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
"काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरु केले. गांधीजींनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात करो या मरोचे आवाहन केले. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन," असे पाटील म्हणाले. "ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असलेल्या महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना सांताक्रुज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या काळी लढा हा ब्रिटिशांविरोधात होता. आज लढा लोकशाहीची खिल्ली उडवणाऱ्या स्वकियांसोबत आहे. लोकशाहीसाठीच्या या लढाईत आम्ही मागे हटणार नाही," असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले, "महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांच्या प्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे सध्याच्या ब्रिटिशांप्रमाणे राज्य करणारे सरकारला हद्दपार करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो लोकांनी प्राणांचे बलिदान दिलं आहे. हजारो लोकांनी तुरुंगवास भोगला आहे. या देशातील सरकार जनतेच्या सोयीचं नाही शोषण करणार आहे म्हणून त्या ब्रिटिशांच्या सरकारच्या विरोधात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलन करण्यात आले होते. योगायोगाने आज महात्मा गांधी यांच्या नातू तुषार गांधी यांना सांताक्रुज पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे. हा योगायोग आहे की तशीच परिस्थिती पुन्हा या देशात निर्माण झाली आहे ? असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे."
जयंत पाटील पुढे बोलताना म्हटले, दक्षिण मुंबईतील या परिसर परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या वास्तू ब्रिटिशांच्या राज्यात निर्माण करण्यात आल्या होत्या. रस्ते, पाणी, लाईट, हायवे झाले म्हणजे विकास झाला मानणारा एक वर्ग आजही आहे आणि ब्रिटिश काळात देखील होता. मात्र राज्य राज्यकर्त्यांचा विचार कोणता राज्यकर्त्यांची काम करण्याची दिशा कोणती आहे. या विचाराला जनतेने त्यावेळी 1947 मध्ये प्राधान्य दिले ब्रिटिशांचं सरकार हे आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाणार नाही तर आपलं शोषण करणार आहे. हे जनतेला कळाले होते. चातुर वर्गाचा परिणाम त्यावेळी जो समाजावर होता त्याच चातुरवर्गाचा न्यू ओढणारा आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या विरोधात आपण गेलो पाहिजे अशी धारणा त्यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आले होते."
आज पुन्हा या देशांमध्ये लोकांचं मत आहे ज्याप्रमाणे लोकशाही विरोधी काम सुरू आहे लोकशाहीच्या या सर्व संदर्भात कुठेतरी काहीतरी चुकत आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा हळूहळू एकत्रित येऊ लागले आहे. त्यामुळे आज या दिवसाला अधिक महत्त्व आहे. जेव्हा केव्हा भारतामध्ये अन्याय अत्याचार लोकशाही विरोधात सर्वच घटकांनी भूमिका घेणे अशा गोष्टी ज्यावेळी करतात त्यावेळी लोकांना आजच्या 9 ऑगस्ट रोजीची आठवण होते. म्हणून आजच्या दिवसाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट मिळालं असलं तरी 9 ऑगस्ट ला त्याचं महत्त्व अधिक आहे. या दिवशी देशातील जनतेने एक निर्धार केला सत्ता सत्तारूढंना हलवण्यासाठी एकसंघ होण्याचा निर्धार केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन पक्ष वाढवण्यासाठी काम केले पाहिजे पक्षातून अनेक लोक बाहेर गेले तर काही दूर जाण्याच्या या मनस्थितीत आहे तर काही लोक ठामपणे आपल्या सोबत आहे. जे आपल्या सोबत ठामपणे आहेत त्यांना पक्ष वाढवण्यासंदर्भात अनेक जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आणखी वाढवले पाहिजे तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या करिता तयारीला लागले पाहिजे असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना मानणारा कार्यकर्ता ची नाळ अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोडलेली आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार साहेब यांना मान्यता कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी कार्यकर्ता शरद पवार साहेबांसोबत आहे हे दाखवून दिले आहे सत्ता असो किंवा नसो कार्यकर्ता नेहमीच शरद पवार साहेबांसोबत ठामपणे उभा असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.