ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ -' आमच्यासाठी आमचा देश सर्वप्रथम येतो. यापुढे आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, तसेच त्यांना कोणत्याही चित्रपटात काम देणार नाही ' असा निर्णय प्रोड्युसर्स असोसिएशन घेतल्याचे मुकेश भट्ट यांनी स्पष्ट केले. 'तसेच चित्रपटाच्या सुरूवातील उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल तसेच चित्रपट हिट होवो वा फ्लॉप , चित्रपटाच्या कमाईतील काही वाटा उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येईल' असेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरच बॉलिवूडने नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरेंनी अद्याप या मुद्यावर भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने चित्रपट प्रदर्शनाचे भवितव्य अजूनही अंधारात आहे.
- ' उरी ' येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक यांनंतर देशभरात पाकविरोधी वातावरण तापलेले असून बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी अभिनेता ' फवाद खान' याच्या भूमिकेमुळे दिग्दर्शक करण जोहरचा बहुप्रतिक्षित 'ए दिल है मुश्किल' चित्रपटही अडचणीत सापडला असून मनसेच्या भूमिकेमुळे चित्रपट प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत.
यावर बॉलिवूड कलाकारांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेही धाव घेतली होती, मात्र त्यानंतरही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर करण जोहरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मदत मागितली नुकतीच ' वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, करण जोहर यांच्या दरम्यान चर्चा झाली. त्यावेळी अमेय खोपकर, निर्माते मुकेश भट्ट, सिद्धार्थ रॉय कपूर आदी उपस्थित होते.
I assured Mr.Fadnavis that the Producer's Guild has decided that we will not work with Pakistani artists in the future: Mukesh Bhatt pic.twitter.com/VUiVJQ89mq— ANI (@ANI_news) October 22, 2016