शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शाळेचे भाडे देणार; राज्य सरकारने लोकायुक्तांना दिली माहिती, १५०० जणांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 9:00 AM

जागेचे भाडे न मिळाल्याने अन्सारी यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र शालेय शिक्षणासाठी मंजूर होणाऱ्या निधीमध्ये भाडे देण्याची तरतूद नाही, असे शासनाने सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  शाळेसाठी इमारत भाडेतत्त्वावर घेतल्यास त्याचे भाडे दिले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने लोकायुक्त माजी न्या. व्ही. एम. कानडे यांच्यासमोर दिली आहे. याचा लाभ राज्यभरातील १५०० जणांना मिळणार आहे, ज्यांनी आपली जागा राज्य शासनाला शाळा सुरू करण्यासाठी दिली आहे. 

नांदेड येथील मोहम्मद लियाकत अली अन्सारी यांनीही जिल्हा परिषदेला शाळा चालविण्यासाठी आपली जागा दिली होती. त्यांना गेली १० वर्षे भाडे मिळाले नव्हते. त्यांची थक्कबाकी सुमारे १५ लाख रुपये होती. ही रक्कम त्यांना येत्या आठ ते दहा दिवसात मिळेल, असे आश्वासनही लोकायुक्तांसमोर देण्यात आले आहे. या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर त्याची माहिती सादर करण्याचे आदेशही लोकायुक्त न्या. कानडे यांनी दिले.

जागेचे भाडे न मिळाल्याने अन्सारी यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र शालेय शिक्षणासाठी मंजूर होणाऱ्या निधीमध्ये भाडे देण्याची तरतूद नाही, असे शासनाने सांगितले. मात्र  राज्य शासन अनेक ठिकाणी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शाळा सुरू करते. काही ठिकाणी माफक भाडे घेऊन जागा मालक आपली जागा देत असतात. अधिकाधिक जणांना शिक्षण मिळावे, हा त्यामागचा हेतू असतो. जागा भाडेतत्त्वावर घेतल्यावर त्याचे भाडे वेळेत मिळायला हवे. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना लोकायुक्त न्या. कानडे यांनी राज्य शासनाला केली होती.  त्यानुसार, शाळेसाठी जागा देणाऱ्या जागा मालकांना भाडे देण्याची तरतूद केल्याचा अध्यादेश जारी केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त सचिव वंदना कृष्णा यांनी लोकायुक्त न्या. कानडे यांना दिली.

शिक्षणाला प्राधान्य हवे केरळमध्ये १०० टक्के शिक्षित आहेत. महाराष्ट्रात ही टक्केवारी गाठायची असेल तर राज्य शासनाने शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे, असे निरीक्षणही लोकायुक्त न्या. कानडे यांनी नोंदवले आहे.