सोलापूर : सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करत नाही. सोलापुरशी ऋणानुबंध असल्याने दौरा केल्याचे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मोदींना राम मंदिरावरून टोला लगावला.
शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटीलविरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सोलापूर शहर, बार्शी, दक्षिण सोलापूर मध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. तसेच माजी मुख्य सचिव अजय मेहता यांना सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आढावा घ्यायला सांगणार असल्याचेही म्हटले.
यानंतर पवार यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असे पवार यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
डायनामाईटने SBI चे एटीएम उडविले; 23 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर
चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच