विश्वास खोड - पुणो
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून नाराज असलेले रिपाइंचे खासदार रामदास आठवले हे पुण्यातील गणोश मंडळांना भेटी देऊन आरत्याही करणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात रिपाइंला चांगला वाटा मिळावा, यासाठी ते गणोशाला साकडे घालणार की काय, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात रंगली आहे.
या पक्षाचे प्रवक्ते अजरुन डांगळे लोकमतशी बोलताना म्हणाले, रिपब्लिकन पक्षात मराठा, ब्राrाण समाजाचेही कार्यकर्ते आहेत. त्यांचे संघटन करण्याच्या दृष्टीने खासदार आठवले पुणो शहरात सर्व ठिकाणच्या गणपती मंडळांना भेटी देणार असून आरत्या करणार आहेत. 6 सप्टेंबर रोजी ते सायंकाळी साडेसहा वाजता दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देणार आहेत. दगडुशेठ हलवाई गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावण्याचे ठरविले आहे. खासदार आठवले यांनी आजवरच्या राजकीय प्रवासात गणोशोत्सव मंडळांना भेटी देण्याचा आणि आरत्या करण्याचा उपक्रम केल्याचे ऐकिवात नाही. गणोशोत्सवाचा राजकीय लाभ घेण्यासाठी त्यांनी आरत्या आणि मंडळांना भेटींचा कार्यक्रम आखला आहे.