शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
3
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
5
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
6
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
7
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
8
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
9
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
10
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
11
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
12
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
13
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
15
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
17
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
18
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
19
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
20
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक

मुख्याध्यापकांचे पद कायम ठेवणार!

By admin | Published: May 25, 2017 2:04 AM

शिक्षण संचालक : मुख्याध्यापक संघाला दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शाळांमधील कार्यरत मुख्याध्यापकांचे पद न बदलविता, त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत पद कायम ठेवू, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक जरग यांनी महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत दिले. बैठकीमध्ये महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांचे पद सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवण्याच्या मागणीसह अनेक शैक्षणिक समस्या शिक्षण उपसंचालक जरग यांच्यासमोर मांडल्या. बैठकीला मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, राज्याध्यक्ष मारोतराव खेडेकर, सचिव नंदकुमार बारवकर, उपाध्यक्ष मोहन पाटील. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सचिव सतीश जगताप, कार्याध्यक्ष अशोक पारधी, पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भालचंद्र अवताडे, सचिव प्रमोद नेमाडे, विलास भारसाकळे, मेघश्याम करडे, अशोक चोपडे, रवींद्र कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक जरग यांच्यासमोर शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करणे, तसेच मुख्याध्यापकांच्या अतिरिक्त पदाला संरक्षण असल्याने त्यांचे पद संचमान्यतेमध्ये दाखवावे, २०१३ व १४ पासून संचमान्यतेमधील अनेक शाळांच्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. त्या दुरुस्त करूनच समायोजन करावे, संचमान्यता दुरुस्ती करून नववी व दहावी वर्गाला किमान तीन पदे मंजूर करावी, खासगी शाळांना आयटीसी प्रयोगशाळा, सीसी कॅमेरे व इमारत बांधकाम अनुदान मंजूर करून मूल्यांकन झालेल्या शाळा व तुकड्यांना अनुदान द्यावे, प्लॅनमधील शाळा नॉनप्लॅनमध्ये असल्याने शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यास मंजुरी द्यावी, ज्या शाळांमध्ये माध्यमिकपर्यंत वर्ग आहेत, त्यांचा कारभार एकत्रित करून संचमान्यता द्यावी, मुख्याध्यापकांची वेतनश्रेणीमधील त्रुटी सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्राच्या उपमुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीबरोबर असावी, शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार, आरटीईप्रमाणे शाळांना शिक्षक पदे भरण्याची मंजुरी द्यावी आदी मागण्या मांडल्या. शिक्षण उपसंचालक जरग यांनी यातील काही मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शिक्षक भरती सुरू करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक जरग यांच्याकडे शासनाने २०१२ पासून शिक्षक भरती बंद केल्यामुळे लाखो बीएड, डीएड शिक्षित विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे, तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने शिक्षक भरती सुरू करावी, अशी मागणी केली. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून २००५ च्या नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणीही मुख्याध्यापक संघाने केली आहे.