शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अनधिकृत बांधकाम प्रश्न सोडविणार

By admin | Published: October 01, 2014 12:25 AM

‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

पिंपरी : ‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे  वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते. 
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. त्याचे व्याज दिले तर विकास कशातून करायचा हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र कजर्बाजारी कोणामुळे झाला,  का झाला, ज्या कामात भ्रष्टचार झाला, तो कोणामुळे झाला याची माहिती जनतेला मिळायला हवी. चुकीच्या कामांमुळे महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सिंचनाबाबत श्वेतपत्रिका काढली त्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 7क् हजार कोटी खचरून सिंचन मात्र क्.1 टक्के वाढले. आजही शेतीला पाणी मिळत नाही. सिंचनाचा पैसा गेला कुठे? भ्रष्टाचार वाढल्यामुळे शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. एकेकाळी वीजनिर्मितीत आघाडीवर असणा:या राज्यात आज वीज नाही. त्यामुळे शेतमालाला भाव नाही. यातून कजर्बाजारी झालेल्या शेतक:यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. वीज नसल्याने पंपावर कर्ज झाले आहे. व्याजाचा मीटर चालू झाल्याने वीज मीटर बंद झाला आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळत नाही. व्यापारी एलबीटीने त्रस्त आहेत. एकाही क्षेत्रत समाधान नाही.’’
गडकरी म्हणाले, ‘‘जात, पंथ, भाषेचा आधार घेऊन भाजपा काम करीत नाही. शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या नावाने लक्ष्मीदर्शनाचे काम आघाडी सरकारने केले आहे. मुख्यमंत्री फायलींवर बसून आहेत. म्हणूनच शरद पवार म्हणाले होते, त्यांच्या हाताला लकवा मारलाय, ते खरे आहे.’’
जगताप म्हणाले, ‘‘नागपूरचा विकास झाला, तसा पिंपरी-चिंचवडचा विकास झाला नाही. या शहराचे शांघाय करण्याची गरज आहे. विनापरवाना बांधकामे, पूररेषा, शास्तीकराचे प्रश्न सुटण्यासाठी मी भाजपामध्ये आलो आहे.’’ (प्रतिनिधी)
 
पुण्यातही मेट्रो, रस्ते विकासास प्राधान्य, 
देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्गास पाच हजार कोटी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, सोलापूर-कोल्हापूर अशा विविध रस्त्यांच्या 4क् हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. नागपूरला मेट्रो आली, तर मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाली. नागपूरला अगोदर मेट्रो कशी, असा प्रश्न त्यांनी केला. तुमची फाईल कोठे होती? मंत्रलयातच ना, कारण तुम्हीच तिच्यावर बसून होतात. कोणताही प्रस्ताव दिला नसताना मेट्रो येईल कशी? आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. पुण्यातही मेट्रो येईल.
 
आरटीओ कार्यालय व पांढ:या वेशातील पोलिसांची गरज भासणार नाही. कारण सर्व परवाने ऑनलाइन केले जातील. एखाद्या मंत्र्याने सकाळी सिग्नल तोडला, तर दंडाची पावती त्याच्या घरी सायंकाळी पोहोचेल. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे ध्येय आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री