मुंबई : मराठा आरक्षणाप्रकरणी सादर करण्यात आलेल्या माहितीची छाननी आणि विश्लेषण करण्यासाठी सर्व याचिका मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करणार का? सरकार मागासवर्ग आयोगाकडे जाणार का, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने ४ मेपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मराठा आरक्षण प्रकरण मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यास आपली त्यावर काहीच हरकत नसेल, अशी भूमिका आतापर्यंत राज्य सरकारने घेतली आहे. मात्र आपण स्वत:हून हे प्रकरण मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करू, असे सरकारने स्पष्ट केले नसल्याने मंगळवारी न्यायालयाने त्याबाबत थेट विचारणा केली. सरकार मागासवर्ग आयोगाकडे जाणार की आम्ही आदेश दिल्यावरच हे प्रकरण आयोगाकडे जाणार, याबाबत सरकारने ४ मेपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)
राज्य सरकार मागासवर्ग आयोगाकडे जाणार का?
By admin | Published: May 03, 2017 4:37 AM