पुणे : देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही. सरकारने मागण्यांबाबत विचार न केल्यास भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचीवाहतूक थांबविण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे पत्र केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे.देशभरातील डिझेलचा दर समान करावा, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमीयम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांचीसक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटन वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा, अशाविविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदेलनाची हाक दिली आहे.चक्का जाम आंदोलनामुळे उद्योग-व्यवसायांचे दररोज २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान केवळ वाहतूक क्षेत्राचे आहे.देशात १ कोटी ट्रकचालक असून, आॅल इंडिया मोटार संघटनेकडे दीड कोटी सभासद आहेत. सरकारकडून मागण्यांचा विचार न झाल्यासपुढील टप्प्यात दूध, पेट्रोल-डिझेल टँकर, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.माथाडी कामगारांचा आज बंदट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून बेमुदत बंद व चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांचे काम व मजुरी ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अवलंबून आहे.यामुळे वाहतुकदारांच्या बेमुदत बंदला पांठिबा देण्यासाठी व मराठा आंदोलन व आरक्षण मिळावे यासाठी औरगांबाद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांना जलसमाधी घेऊन प्राणांची आहुती द्यावी लागली.या घटनेच्या निषेधार्थ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बुधवारी (दि. २५) बंद पुकारला आहे.