शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
2
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
3
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
4
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
5
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
6
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
7
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
8
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
9
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
10
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
11
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
12
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
13
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
14
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
15
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
16
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
18
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
19
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
20
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा

‘वंचित फॅक्टर’ यंदाही  निर्णायक ठरणार का? तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:59 PM

आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत  आलेला होता... राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी नवीन पर्याय म्हणून समोर आली आहे...

कधी स्वबळ तर कधी कोणासोबत जाण्याचा प्रयोग करत राजकारण करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही सत्त्वपरीक्षाच असेल. आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत  आलेला होता.

पण यंदा लोकसभेला वंचित फॅक्टरवर मात करत मविआने यश मिळविले. वंचितला मिळणारी मते मोठ्या प्रमाणात घटली. परंतु तो अपवाद होता, हे सिद्ध करण्याची आंबेडकर यांच्यासाठी ही निवडणूक संधी असेल. शिवसेना, एमआयएम, कम्युनिस्ट, काँग्रेस असे बरेच मित्र आंबेडकर यांनी त्या-त्या वेळी बदलले. फक्त भाजपसोबत ते थेट कधीही गेले नाहीत.

तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का? -राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी नवीन पर्याय म्हणून समोर आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे असे नेते या ‘परिवर्तन महाशक्ती’ मध्ये एकत्र आले आहेत. या आघाडीची १७ ऑक्टोबरला पुण्यात बैठक होईल. आणखी काही पक्ष सोबत यावेत असे प्रयत्न केले जात आहेत.  संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार आहेत. तरी त्यांच्या पुत्राने राजकारणाची वेगळी वाट धरत महायुती, महाविकास आघाडीपासून सुरक्षित अंतर ठेवले आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती