शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
2
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
3
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
4
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
5
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
6
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
7
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
8
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
9
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
10
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
11
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
12
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
14
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
15
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
16
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
17
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
18
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
19
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
20
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?

धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात तोडगा निघणार? आज मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 9:35 AM

Dhangar community hunger strike : शासनाच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१४) उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

Dhangar community hunger strike : पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज (१५ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

शासनाच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१४) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सह्याद्री अतिथिगृहावर याबाबत बैठक ठेवली असून त्यातून समाधानकारक तोडगा निघेल, असे शिष्टमंडळाने सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. 

आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीसाठी धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून अॅड. सुभाष गोफणे, अनिल झोरे, सुभाष मस्के, बिरू कोळेकर, पंकज देवकते, प्रशांत घोडके, आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. याच सोबतच या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, अतुल सावे आणि विजय गावित हे मंत्री उपस्थित असणार आहेत. 

या बैठकीचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे असून आज रविवार असला तरी आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता ही बैठक आज घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी असून यात अनेक कायदेशीर अडचणी असल्याने या बैठकीसाठी शासनाकडून कायदे तज्ज्ञांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDhangar Reservationधनगर आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र