शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पापलेट नामशेष होणार?

By admin | Published: April 26, 2016 4:27 AM

पालघर-पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारो पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत.

हितेन नाईक,

पालघर-पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारो पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटीच्या दोन संस्थामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२४ टन (तीन लाख २४ हजार किलो) पापलेटची आवक कमी झाली आहे. पालघर जिल्ह्यात ‘करल्या डोली’ द्वारे पापलेटच्या लहान पिल्लाची होणारी खुलेआम कत्तल हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे माहीत असूनही पालघर, वसई, उत्तनमधील काही मच्छीमारांनी आतापासून पुन्हा करल्या डोलीच्या मच्छीमारीला मोठ्या प्रमाणात सुरु वातही केली आहे.राज्याला ७२० किमी च विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून देशाला मत्स्य उत्पादनातून परकीय चलन मिळवून देणारा हा एक प्रमुख व्यवसाय आहे. परंतु मोठ्या यांत्रिकी, अद्ययावत सामुग्री नौकांद्वारे केली जाणारी अपरिमति मासेमारी, पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे, रासायनिक करखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी- ओएनजीसी प्रकल्पातून होणारी तेल गळती, शासनाचे मच्छीमारांप्रती असलेले उदासीन धोरण अशा विविध कारणांमुळे मासेमारी व्यवसायाला फटका बसू लागला आहे. मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाने मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या अनुषंगाने १० जून ते १५ आॅगस्ट असा ६६ दिवसांचा पावसाळी मासेमारीबंदी कायदा घोषित करुन त्याची कडक अंमलबजावणी केल्याने मत्स्य प्रजनन आणि संवर्धन होवून मत्स्य उत्पादन समाधानकारक सुरु होते. परंतु पर्ससीनसारख्या मासेमारीमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागल्याने ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व संस्थानी एकजूट दाखवित १५ मे पासून संपूर्ण मासेमारी बंद ठेवून मत्स्य प्रजनन आणि संवर्धनला हातभार लावला होता. या उपक्र माला राज्य सरकारनेही पाठिंबा दिला. त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत मोठी वाढ होईल, असे मच्छीमार संस्थांना अपेक्षित होते. राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्याचे परिणाम दिसेपर्यंत केंद्र सरकारने १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कमी कालावधी जाहीर केला. त्यामुळे मासेमारीच्या संवर्धनाचा कालावधी वाढविण्यापेक्षा तो घटवण्यामागे नेमके काय कारण आहे, ते मच्छीमारांना समजू शकलेले नाही.