महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनाही स्थान देण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी भजप आणि शिवेसेच्या शिंदे गटाविरोधात रान उठवले आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी "भाजपने राठोडांना क्लिन चिट देऊन आणले आहे. यामुळे माझी संजय राठोडांच्या वतीने भाजपला विनंती आहे, की त्यांनी राठोडांची, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी, असे म्हटले होती. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्या झी २४ ताससोबत बोलत होत्या.
काय म्हणाल्या चित्रा वाघ - यासंदर्भात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "सुप्रिया ताई या राज्यातील खूप मोठ्ठ्या नेत्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या होत्या. आजही त्या तिथल्या नेत्या आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? महाविकास आघाडीने, मग त्यात राष्ट्रवादी आली, काँग्रेस आली, शिवसेना आली, तिची ज्या पद्धतने धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले, तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
संजय राठोडांना महाविकास आघाडीने सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली -संजय राठोड यांच्या विरोधातील लढा चालूच राहणार. आम्ही काल ज्या पद्धतीने आमची भूमिका मांडली होती, त्याच पद्धतीने हा लढा सुरू राहील. संजय राठोडांना महाविकास आघाडीने म्हणजेच ठाकरे सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली होती. यामुळ तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना विचारायला हवे, की त्यांना कशी क्लिनचिट मिळाली? यासंदर्भात मी पीआयएल दाखल केली आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.