शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

गाणार जाणार की येणार? काँग्रेस पहिल्यांदाच मैदानात

By admin | Published: January 25, 2017 2:57 AM

नागपूर शिक्षक मतदारसंघात कोण निवडून येणार? विद्यमान आमदार नागो गाणार जाणार की पुन्हा येणार, कॉँग्रेसचे अनिल शिंदे मैदान मारणार की,

जितेंद्र ढवळे / नागपूरनागपूर शिक्षक मतदारसंघात कोण निवडून येणार? विद्यमान आमदार नागो गाणार जाणार की पुन्हा येणार, कॉँग्रेसचे अनिल शिंदे मैदान मारणार की, शिवसेनेचे प्रकाश जाधव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गडाला धक्का देणार? अशा राजकीय गप्पांचा फड सध्या नागपूर विभागातील शाळांमधील स्टाफ रूममध्ये रंगतो आहे. ३४,९८७ शिक्षक मतदार असलेल्या या मतदार संघात ३ फेब्रुवारीला मतदान होईल. एकूण १६ उमेदवारांनी शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी या मतदार संघात उडी घेतली आहे. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोठा असला, तरी विजयाचा इतिहास नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कलासोबतच राहिला आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १४,९८७ मतदार आहेत. त्यामुळे नागपूरकर गाणार जाणार की येणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाचा पाठिंबा असलेल्या राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार उमेदवार आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी मतांची फिल्डिंग लावली आहे. मात्र, गाणार यांना भाजपा आणि संघ परिवारातून फटाके लागले आहेत. संघ परिवारातील संजय बोंदरे आणि वर्धा येथील शिक्षक परिषदेशी जवळीक असलेले शेषराव बिजवार यांनी स्वबळाचा नारा दिला असल्याने गाणार यांच्या मतांचे गणित बिघडणार आहे. शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेने या मतदार संघात दंड थोपटले आहे. सेनेतर्फे रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव मैदानात आहेत, तर काँग्रेसने चंद्रपूरचे प्रा. अनिल शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्यावर एकाएकी विश्वास टाकल्याने नागपूर जिल्हा काँग्रेस सेलमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतता आहे. निष्ठावंतांना संधी का नाही? असा सवाल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केला आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्राचार्य बबनराव तायवाडे यांचे निष्ठावंत असलेल्या शिंदे यांच्यासाठी तायवाडेंची यंग टीचर्स असोसिएशन कामी लागली आहे. चंद्रपुरातील ५,६३८ मतदारापैकी ६० टक्के मते मिळाली की, तायवाडे नागपुरात ताकद लावतील, असा शिंदे यांचा तर्क आहे. काँग्रेसी विचार असलेले शिक्षक आजवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (विमाशि) उमेदवारासोबत राहायचे. मात्र, या वेळी विमाशि आणि काँग्रेस समोरासामोर आहे. विमाशिचे आनंद कारेमोरे यांचा शिंदे यांना फटका बसेल की, विजयाचे गणित सोपे होईल, हे लवकरच स्पष्ट होईल.