संपूर्ण भारताला हादरवून टाकलेल्या, २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या १२ मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात देहदंडाची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमन हा ठरल्या तारखेप्रमाणे येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकेल? की त्याची फाशी लांबणीवर जाईल? याचा फैसला आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होईलच... पण मुळात बॉम्बस्फोटांच्या काही तास आधी इतर कुटुंबीयांसोबत मुंबईहून पळून गेलेला हा याकूब भारतात परत का आला? त्याला अटक करून आणले गेले, की तो स्वत:हून आला? हे मुद्दे अजूनही वादाचे आहेत. याकूब भारतात परत आल्यावर काही दिवसांतच त्याची जी पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली त्यातून यापैकी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ‘इंडिया टुडे’ वृत्तसमूहातर्फे त्या वेळी प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘न्यूजट्रॅक’ या ‘व्हिडीओ मॅगेझिन’साठी त्याची ही मुलाखत मधु त्रेहान यांनी घेतली होती. त्यातून या बॉम्बस्फोटांच्या कारस्थानात पाकिस्तान सरकार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसे गुंतलेले होते यावर स्वच्छ प्रकाश पडतो. त्या मुलाखतीत याकूबने सांगितलेल्या अनेक गोष्टींवर, आज विश्वास ठेवणे कठीण असले तरी, आता याकूबची मन:स्थिती तेव्हा काय होती? हे ‘लोकमत’च्या वाचकांसमोर ठेवण्यासाठी ती इंग्रजीत असलेली मुलाखत आम्ही जशीच्या तशी, साभार प्रसिद्ध करीत आहोत...
याकूबवर तुम्ही विश्वास ठेवाल?
By admin | Published: July 27, 2015 1:29 AM