शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

हवाई दलातील विंग कमांडरला ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक

By admin | Published: October 03, 2016 8:30 PM

२ आॅक्टोबर रोजी खासगी वाहनाने नांदेडला आल्यानंतर कोल्हापूरला पळून जाण्याच्या बेतात असताना नांदेड पोलिसांनी त्याला पकडले.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 3 - हैदराबाद येथे ड्रग्जच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला हवाई दलातील विंग कमांडर जी़ राजशेखर जी़ जयन्ना (रा. हैदराबाद) हा २ आॅक्टोबर रोजी खासगी वाहनाने नांदेडला आल्यानंतर कोल्हापूरला पळून जाण्याच्या बेतात असताना नांदेड पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून साडे सात लाख रुपये रोख, पाच मोबाईल, चेकबुक व अनेक कंपन्यांचे सीमकार्ड जप्त केले.हैदराबाद येथील पोलीस महानिरीक्षक प्रेमानंद सिन्हा यांनी २ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्याशी संपर्क साधून ड्रग्ज प्रकरणातील आरोपीबाबत गोपनीय माहिती दिली होती. सदरील आरोपी हा इलेक्ट्रॉ कार (क्रमांक-यूपी़-१४-बी़डब्ल्यू-१८२८) ने आदिलाबाद मार्गे नांदेड येथे आला असून, सध्या तो नांदेड शहरातच फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक येनपुरे यांनी लगेच सहाय्यक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह सपोनि विनोद दिघोरे, पोउपनि नेटके, पोलीस नायक दशरथ जांभळीकर, सदाशिव आव्हाड, बालाजी शिरगिरे, विठ्ठल कत्ते, दत्ता जाधव, खवास पाटील, श्रीनिवास चेनाजोलू, बालाजी पोतदार, बालाजी केंद्रे, जसवंतसिंघ साहू तसेच गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ़ श्रीमंगले, जिनेवाड, स्वाधीन ढवळे या कर्मचाऱ्यांची वेगवेगळी चार पथके केली़ त्यांनी नांदेड शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, हिंगोली नाका, एनआरआय यात्री निवास, हॉटेल्स, ट्रॅव्हल्स पॉर्इंट आदी ठिकाणी शोध घेणे सुरू केले होते. रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हल्ससमोर कोल्हापूर ट्रॅव्हल्समध्ये बसून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी हटकले. पोलिसांनी लगेच त्या संशयिताला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने आपले नाव जी़राजशेखर जी़जयन्ना असून हवाई दलात विंग कमांडर या पदावर असल्याचे सांगितले़ याबाबत नांदेड पोलिसांनी लगेच नार्कोटीक कंट्रोल ब्युरोशी संपर्क साधून संशयित हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याची खात्री करुन घेतली़ पोलिस अधीक्षक येनपुरे व सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही माहिती चेन्नई साऊथ झोन, बंगळुरु-हैदराबाद येथील पोलिस उपमहानिरीक्षक प्रेमानंद सिन्हा यांना दिली़ त्यानंतर एऩसी़बी़ च्या तपास पथकाने नांदेडला येवून विंग कमांडर जी़राजशेखर याला ताब्यात घेतले़ ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद येथे मोठे रॅकेट कार्यरत असून त्यातील काही आरोपींना यापूर्वीच हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे़ >४६ कोटींचा माल जप्तनार्कोटीक कंट्रोल ब्युरो हैदराबाद व बंगळुरु यांनी अंमली पदार्थ प्रकरणात एम़व्ही़रामाराव (रा़हैदराबाद) याला अटक केली होती़ त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदराबाद व बंगळुरु या दोन ठिकाणी छापे टाकून २३१ किलो अँफीटामाईन नार्कोटीक नशेचा पदार्थ ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४५ कोटी रुपये किंमत आहे़ त्याचबरोबर रोख १ कोटी २३ लाख रुपये असा एकूण ४६ कोटी २३ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता़ रामारावकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदराबाद पोलिस या प्रकरणातील मुख्य आरोपी विंग कमांडर जी़राजशेखर याच्या शोधात होते़ अंमली पदार्थ प्रकरणाचे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून विंग कमांडर जी़राजशेखर याचे विदेशातही अनेक तस्करांशी संबंध होते़राजशेखर जाणार होता विदेशात पळून जी़राजशेखर हा विंग कमांडर असल्यामुळे विदेशातही त्याचे अनेकांशी संबंध होते़ या ओळखीचा फायदा घेवून तो अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवित होता. परंतु हैदराबाद येथे त्याचा साथीदार एम़व्ही़रामाराव पकडल्या गेल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. रामाराव याला पकडल्याची माहिती मिळताच, जी़राजशेखर दिल्ली येथून आपल्या खाजगी वाहनाने एकटाच निघाला होता. दिवसरात्र प्रवास करुन त्याने कसेबसे मध्यप्रदेश गाठले़ या ठिकाणी पाच हजार रुपये देवून एका चालकाला सोबत घेतले़ प्रवास करीत आदिलाबादमार्गे तो नांदेडला आला. या ठिकाणी कोल्हापूरच्या ट्रॅव्हल्समध्ये बसून त्यापुढे दिल्ली व नंतर विदेशात पळून जाण्याचा त्याचा बेत होता़ परंतु नांदेड पोलिसांनी तत्परता दाखवित त्याला अटक केली.