कोल्हापूर : कलाप्रकारांच्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने ३२ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उपविजेते ठरले. यजमान शिवाजी विद्यापीठाला शोभायात्रेतील उत्कृष्ट सादरीकरणाबाबत चौथा क्रमांक मिळाला. शिवाजी विद्यापीठात गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या, तरुणाईच्या कलाविष्काराने बहरलेल्या युवा महोत्सवाचा जल्लोषी वातावरणात मंगळवारी समारोप झाला. अभिनेते सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी. आर. मोरे होते.महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपदाच्या गटात अमृतसरची गुरुनानक युनिव्हर्सिटी तृतीय, तर पंजाबची लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने चौथा क्रमांक मिळविला. शोभायात्रेत आंधप्रदेशच्या कृष्णा युनिव्हर्सिटीने प्रथम, आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीने द्वितीय, हरियाणाच्या कुरूक्षेत्र विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला. यजमान शिवाजी विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी आॅफ म्हैसूरला चौथा क्रमांक विभागून देण्यात आला. (प्रतिनिधी)कलाप्रकार निहाय विजेतेपदसंगीत (अनुक्रमे विजेते, उपविजेते) : गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठ. नृत्य : मणिपूर युनिव्हर्सिटी, कुरूक्षेत्र विद्यापीठ. साहित्य : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गुवाहाटी युनिव्हर्सिटी. नाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई.ललित कला : मुंबई विद्यापीठ, गुलबर्गा युनिव्हर्सिटी कर्नाटक.
मुंबई विद्यापीठ ‘शिवोत्सव’मध्ये विजेते
By admin | Published: February 16, 2017 4:32 AM