पुणे : राज्यात थंडीचे पुन्हा आगमन झाले असून, मंगळवारी सर्वात कमी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे तापमान सरासरीच्या खाली गेले होते.देशाच्या उत्तरेकडून येणारे थंड बोचरे वारे राज्यात वेगाने वाहू लागले आहेत. हवेतील आर्द्रताही कमी झाल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत विदर्भातील तापमानात मोठी घट नोंदवली गेली. नागपूरपाठोपाठ नाशिकचे तापमान १०.२ अंश, अकोल्याचे तापमान १०.६ तर मालेगावचे तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
राज्यात थंडीचे पुन्हा आगमन
By admin | Published: January 07, 2015 2:29 AM