मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. तेथून येणाऱ्या थंड वाºयामुळे थंडीची लाट आली असून महाराष्ट्र पुन्हा गारठला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात कडाक्याची थंडी आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान धुळे येथे ३ अंश सेल्सिअस तर त्यापाठोपाठ परभणी ४ तर नागपूर ४.६ अंशावर होते.बुधवारी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट होती. येथील तापमानाचा पारा घसरल्याने दिवसादेखील चांगलाच गारठा जाणवत आहे. गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, तसे राज्यातील किमान तापमान असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.नागपूरसह विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधील तापमान पारा चांगलाच खाली आला आहे. गेल्या ४ दिवसात नागपूरच्या तापमानात १५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घट झाली आहे. गेल्या आठवड्यात २० अंशावर गेलेले उपराजधानीचे तापमान पुन्हा ४.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सकाळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांचे आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाºया चाकरमान्यांचे हाल होत आहेत.मराठवाड्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. परभणीतील तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत घसरला आहे. दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत असल्याने परभणीकरांना थंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तापमानात घट सुरू झाली. मंगळवारी तापमान ७.५ अंशापर्यंत घसरले होते. बुधवारी पारा आणखी २.५ अंशाने खाली आला. मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर घसरल्याने मुंबईकरांनाही रात्री पुन्हा सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे.ईशान्येत पाऊस; अरुणाचलमध्ये हिमवृष्टीपूर्व भारतातील अनेक राज्यांत पावसाची नोंद झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील उंच ठिकाणी हिमवृष्टी झाली आहे.जम्मू-काश्मीर आणि तमिळनाडूत काही ठिकाणी हलका पाऊस झाला.झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा येथील किमान तापमानात दोन ते चार अंशाची घट झाली.बुधवारचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये : पुणे ८.२, अहमदनगर ६.७, जळगाव ६.४, मालेगाव ७.४, नाशिक ७.६, सांगली १३, सातारा ११.६, उस्मानाबाद १०.६, औरंगाबाद ७, परभणी ७.५, नांदेड ८, अकोला ७, अमरावती ८, बुलडाणा ८.२, चंद्रपूर ८.२, गोंदिया ६.५, नागपूर ४.६, वाशीम ८.२, वर्धा ७.४, यवतमाळ ७.४.
हिवाळा सरताना थंडीच्या लाटेने महाराष्ट्र गारठला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:03 AM