मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. अधिवेशन ७ डिसेंबरला सुरू होणार आहे. १८ डिसेंबरपर्यंतचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुकूलता दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. तिसऱ्या आठवड्यात २१, २२ आणि २३ डिसेंबरला सांगता होईल, असे मानले जात आहे. ९ डिसेंबरला पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. १६ विधेयके सादर करण्यात येतील. त्यात मुंबईच्या विकास आराखड्यामधील सुधारणा, वाळूमाफियांना एमपीडीए लावण्याबाबतच्या विधेयकाचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
हिवाळी अधिवेशन २३ ङिसेंबरपर्यंत!
By admin | Published: November 18, 2015 2:17 AM