मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ते ९ दिवस चालणार आहे. विधानसभा व परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी ही माहिती दिली.अधिवेशनाचे कामकाज ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ व विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बापट यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी कामकाज होईल. बैठकीस अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र सरकारने मुद्दाम अधिवेशन दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विखे यांनी केला.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:07 AM