नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे. ७ ते २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाजही निश्चित झाले झाले आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव सादर करण्यात येईल. विधिमंडळ सचिवालयातर्फे २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव सादर करण्यात येतील. ८ डिसेंबरला अध्यादेश सभापटलावर ठेवण्यात येतील. २०१५-१६ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. शासकीय विधेयके आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ९ डिसेंबरला शासकीय विधेयकासह विरोधी पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ११ डिसेंबरला अशासकीय ठराव होतील. १२ आणि १३ डिसेंबरला सुटी राहील. १४ डिसेंबरपासून दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होईल. १५ डिसेंबरला पुरवणी मागण्यांवरील चर्चेचा समारोप होईल आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येईल. १६ डिसेंबरला विधानसभेत महामंडळाच्या अहवालावर चर्चा होईल. (प्रतिनिधी) सादर होणारी विधेयकेमहाराष्ट्र विधी विद्यापीठ (२८), महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र महानगरपालिका, नगर पंचायत, स्वराज्य संस्था, कृषी पणन, विकास निधी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, नगररचना आदी विधेयके सादर केली जाणार आहेत.
हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे
By admin | Published: December 02, 2015 2:08 AM