धुळे : शहरात जादूटोणा, बुवाबाजी करणा:या नाना पाटील या बुवाबाजी करणा:याचा अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या (अंनिस)कार्यकत्र्यानी भंडाफोड करीत त्याला सौदाणो येथे रंगेहात पकडून दिले. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आह़े
कार्यकत्र्यानी केला भंडाफोड
शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागील सत्यसाई बाबा सोसायटीतील रहिवासी नाना
पाटील हा बुवाबाजीद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार शंकर पंढरीनाथ सगरे
यांनी अंनिसकडे केली होती़ त्यांची दखल घेत शुक्रवारी अंनिसचे
भूषण पाटील यांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या़ त्यात
लगA होत नाही, चांगली नोकरी
मिळत नाही, असे सांगितल़े यावर बाबाने तुमच्या घराला भुताने झपाटले आह़े वडीलोपार्जीत शेतात म्हसोबा आह़े त्यामुळे तुमच्या घराची बाधा दूर करावी लागेल़ त्यासाठी तुम्ही 21 शनिवारी पिंपळाची पूजा करावी, असे सांगितल़े
तुमच्या घरी येतो़ पूजेचे साहित्य मी घेवून येईल़ तुम्ही फक्त पंचामृताचे सहित्य आणून ठेवा़ पूजेसाठी तुम्हाला 51क्क् रूपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितल़े त्यानुसार शनिवारी सकाळी हा बाबा बारापत्थर येथे आला. त्यांना भूषण पाटील यांनी घरी आणल़े इतर दोघा कार्यकत्र्याना पोलिसात तक्रार देण्यास पाठविल़े
तोर्पयत पाटील यांनी घरी पूजा सुरू केली़ पोलीस येईर्पयत बोलण्यात मगA ठेवल़े पोलीस आल्यानंतर त्यांच्यासमोर नाना पाटील यांचा भंडाफोड केला, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली़ पोलिसांनी साहित्य जप्त केले असून नाना पाटील हे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला असल्याचे समजत़े (प्रतिनिधी)
च्शासनाच्या जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत जिलत दाखल हा पहिलाच गुन्हा ठरला आह़े
च्यापुर्वी साक्री तालुक्यात असा प्रकार घडला होता़ राज्यात आतार्पयत 9क् वर गुन्हे दाखल झाल्याची माहिती अंनिसचे
राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली़