- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मी यवतमाळमध्ये आलो होतो. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा यवतमाळकरांच्या भेटीला आलो आहे. मागील १० वर्षांत देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी झालो, त्याच पुण्याईच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा द्याल. ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरणही पार पडले.
यवतमाळमधील नागपूर रोडवरील डोर्ली येथे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइन आणि प्रवासी रेल्वेसह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित करण्यात आला.
२३ मिनिटे ५४ सेकंदांच्या भाषणाने जिंकली सभाnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर ६:०२ वाजता आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहायता गटाने बनविलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. nत्यानंतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. २३ मिनिटे ५४ सेकंदाच्या भाषणात विकासाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सभा जिंकली.
‘शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू’nछत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी महापुरुषांच्या कार्यांला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे झाली आहेत. nराज्यभिषेकानंतरही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वराज्याला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न केले. आम्हीही शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान माेदींनी दिली.
एक रुपयांपैकी १५ पैसेच पोहोचतnमोदी म्हणाले, पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून मंजूर एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असे. म्हणजे मी आता २१ हजार करोड रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात टाकले आहेत. nपूर्वीचे सरकार असते तर यातील १८ हजार कोटी रुपयांची मध्येच लूट झाली असती, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. nविद्यमान सरकार लाभार्थ्याला पूर्ण हक्क देणारे असून हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
राज्यात सर्वाधिक याेजना पूर्णपूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या शंभर सिंचन योजना बासनात गुंडाळल्या होत्या. त्यातील ६० योजना आम्ही पूर्ण केल्या. त्यातही महाराष्ट्रातील योजना सर्वाधिक आहेत.या योजना रखडल्याने लाभार्थी विकासापासून वंचित राहिले. त्यांच्या पापाची शिक्षा या पिढीला भोगावी लागली.आता मात्र तसे होणार नाही. गेल्या १० वर्षांपासून भाजप सरकारने गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी दिशा दाखविली असल्याचे मोदी म्हणाले.
यांची होती उपस्थितीया प्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक आदींची उपस्थिती होती.