शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

कोपर्डी प्रकरणी पीडितेच्या बहिणीची साक्ष

By admin | Published: January 05, 2017 4:06 AM

अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आरोपी माझ्या बहिणीचा पाठलाग करून तिला धमकी देत होते़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा, तू धीट हो त्यांना घाबरू नकोस

अहमदनगर : अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आरोपी माझ्या बहिणीचा पाठलाग करून तिला धमकी देत होते़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा, तू धीट हो त्यांना घाबरू नकोस, असा धीर मी तिला दिला होता, असे सांगत या घटनेचा क्रम कोपर्डीतील मृत पीडित मुलीच्या बहिणीने बुधवारी न्यायालयात सांगितला़कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी पीडित मुलीच्या बहिणीची व आणखी एका साक्षीदाराची साक्ष घेतली़ या वेळी आरोपीच्या वतीने अ‍ॅड़ प्रकाश आहेर, अ‍ॅड़ योव्हान मकासरे व अ‍ॅड़ खोपडे यांनी उलटतपासणी घेतली़ या खटल्यात पीडित मुलीच्या बहिणीने सांगितले की, जितेंद्र शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी घटनेपूर्वी दोन दिवस आधी माझ्या बहिणीचा पाठलाग केला होता़ ही बाब तिने मला सांगितली तेव्हा मी तिला धीर दिला होता. तसेच या वेळी पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंची या मुलीने ओळख पटविली़ दुसरा साक्षीदार असलेल्या मयत मुलीच्या नातेवाइकाने लिंबाच्या झाडाखाली रडण्याचा आवाज आला तेव्हा तिकडे गेलो होतो, असे सांगितले़