गणेश देवकर -
मुंबई : आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. संसाराचा गाडा खेचतानाही बायका पतीच्या खांद्याला खांदा लावून साथ देतात. असे असतानाही बायकांना आजही पतीच्या लाथा खाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे बहुसंख्य महिला पतीकडून होणाऱ्या मारहाणीचे समर्थन करताना दिसत आहेत, तर आजच्या काळातही बायकोला मारणे हा जणू आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, असे मानणारे पुरुषही कमी नाहीत. केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धक्कादायक, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले वास्तव -कारणे आणि त्याचे समर्थन -सकारात्मक : प्रतिकार वाढतोय - नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचे समर्थन करणाऱ्या महिलांचे प्रमाण आधीच्या पाहणीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटले आहे. आधी ते ५२ टक्के इतके होते. तर ही मारहाण योग्य आहे, असे मानणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले आहे. हे आधी ४२ टक्के होते.