राजूर (जि. अहमदनगर) : प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बाळंतपणाला आलेली महिला पाहून आरोग्यसेविका चक्क बाथरूममध्ये लपून बसली. हा धक्कादायक प्रकार वारंघुशी येथे गुरुवारी घडला. आरोग्यसेविकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपकेंद्रास टाळे ठोकले.मंजाबाई निरंकार लोटे यांना गुरुवारी बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या. त्यांना गावातील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. तेथे आरोग्यसेविका संगीता रोकडे नव्हत्या. उपकेंद्रात असलेल्या क्वार्टरमध्येच त्या राहतात. तेथे त्यांची चौकशी केली असता त्या बाहेरगावी गेल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले. सरपंच अनिता कडाळी यांनी आरोग्यसेविकेच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र तेव्हाही त्यांच्या मुलीने त्या बाहेरगावी गेल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर गावात दोन वेळा दवंडी देण्यात आली. तरीही आरोग्यसेविका हजर झाल्या नाहीत. कुटुंबीयांसह गावातील सुईन सोनाबाई लोटे यांनी आशा सेविकेच्या मदतीने बाळंतपण पार पाडले. नंतर पुन्हा त्यांच्या घरी गेल्यावर आरोग्यसेविका रोकडे बाथरूममध्ये लपल्याचे आढळून आले.चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविला आहे. संगीता रोकडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल. उपस्थित नसलेल्या दुसºया आरोेग्यसेविका मनीषा जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.- डॉ. इंद्रजीत गंभिरे,तालुका वैद्यकीय अधिकारी
महिला बाळंतपणाला आली अन् नर्स बाथरूममध्ये लपली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 3:07 AM