शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ट्रकच्या धडकेत महिला ठार

By admin | Published: March 04, 2016 2:23 AM

डाबकी रोडवर अपघात, मुलगा जखमी; संतप्त जमावाने दगडफेक करून ट्रक पेटविला.

अकोला: शहरात वाळू घेऊन येणार्‍या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डाबकी रेल्वे गेटजवळ घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर तुफान दगडफेक करून ट्रक पेटवून दिला. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गायगाव येथे राहणारा विजय तुळशीराम शर्मा (२६) हा युवक त्याची आई पुष्पा तुळशीराम शर्मा (५५) यांना घेऊन एमएच ३0 एएच ४९३२ क्रमांकाच्या मोटारसायकलने अकोल्यातील एका लग्नसोहळय़ात सहभागी होण्यासाठी जात होता. याच मार्गाने अंदुरा येथून वाळूने भरलेला एमडब्लूवाय ३११८ क्रमांकाचा ट्रक जात होता. या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विजयचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती घसरली. पुष्पा शर्मा या मोटारसायकलवरून खाली पडून ट्रकच्या मागील चाकात आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय हासुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या १00 ते १५0 लोकांच्या जमावाने ट्रकवर तुफान दगडफेक केली. काहींनी डिझेल टँक दगडाने फोडून ट्रक पेटवून दिला. घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना, मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी राखीव पोलीस दलाच्या तुकडीला पाचारण केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे, ठाणेदार शेख रफिक, अनिल ठाकरे, रामदासपेठचे ठाणेदार सुभाष माकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पीएसआय पवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली.