पुणो : चारित्र्याच्या संशयावरून सतत होणा:या मारहाणीला कंटाळून प}ीने मुलगा आणि जावई यांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना लोहमार्ग पोलिसांनी उघडकीस आणली. ताडपत्रीमध्ये गुंडाळून देहूरोड-आकुर्डी रेल्वेमार्गावर टाकण्यात आलेल्या मृतदेहाचे गूढ अवघ्या 1क् तासांत उकलण्यात पोलिसांना यश आले.
हनुमंत थावरसिंग राठोड (वय 37, रा. भीमाशंकर, किवळे, देहूरोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी बाळूबाई हनुमंत राठोड (वय 35), मुलगा गणोश हनुमंत राठोड (वय 19), जावई सुनीलकुमार कुमाडअप्पा चव्हाण (वय 22, रा. आनंदमशी कम्पाऊंड, खंडोबामाळ, आकुर्डी), बाबू फत्त्याप्पा पवार (वय 4क्, रा. खंडोबामाळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत राठोड व सर्व आरोपी मूळचे कर्नाटकातील आहेत.
राठोड हा नेहमी बाळूबाई यांचा चारित्र्यावरून संशय घेऊन त्यांना मारहाण करीत असे. त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या
बाळूबाईने पतीच्या खुनाचा कट रचला.
मृतदेह पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. खब:यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 1क् तासांच्या आतच खुनाचे गूढ उकलले. आरोपींना न्यायालयाने 11 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
4पतीचा खून करण्याबाबत तिने मुलगा गणोश, मेहुणा पवार आणि जावई सुनीलकुमार यांच्याशी चर्चा केली. या सर्वानी मिळून राठोडला बांबू आणि काठीने बेदम मारहाण करून ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या ताडपत्रीमध्ये गुंडाळला. हा मृतदेह आकुर्डी-देहूरोड रेल्वेमार्गावर टाकून देण्यात आला.