कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. सध्या ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.जयकुमार यांच्यासह बेपत्ता महिला अधिकाºयाचा भाऊ आनंद बिद्रे, पती राजू गोरे यांनी प्रसारमाध्यमांकडे धाव घेत आपली कैफीयत मांडली. आळते (जि.कोल्हापूर) येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह २००५ साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर अश्विनी पोलीस उपनिरीक्षक झाल्या. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाºया वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. काही कालावधीनंतर कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. त्या हजर झाल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करीत, कुरुंदकर यांच्यावर गुन्हा दाखल केला़दोघांमधील संवाद रेकॉर्ड -अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करून ठेवले होते. अभय कुरुंदरकर यांनी भांडणादरम्यान वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघड झाले. हे सर्व पुरावे देताच कुरुंदकर हे रजेवर गेले. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी अद्यापही ताब्यात घेतलेले नाही, असेही कुटुंबियांनी सांगितले.
महिला पोलीस अधिकारी दीड वर्षापासून बेपत्ता, घातपाताचा संशय; तपासाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:32 AM