नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सिडकोमधील मोगलनगरभागात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ अंबड पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी सहायक आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. मानवी मृतदहेच्या हाडांचा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक एक्सपर्टचे पथकाला पाचारण करत सांगाड्याची हाडे संकलित करुन तपासणीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, डोक्याची कवठी व हाडांच्या सांगाड्यावरून सदर मृतदेह महिलेचा असावा, असा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. साधरण हा मृतदेह महिनाभरापुर्वीचा असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोली करत आहेत.
नाशिकमध्ये स्वच्छता मोहिमेत आढळला महिलेचा कुजलेल्या मृतदेहाचा सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 7:20 PM
नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सिडकोमधील मोगलनगरभागात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून ...
ठळक मुद्दे गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मानवी कवठी व हाडे गाजरगवतामध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ फॉरेन्सिक एक्सपर्टचे पथकाला पाचारण करत सांगाड्याची हाडे संकलित